वाहनाच्या धडकेने वेडसर महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:32+5:302021-01-08T05:12:32+5:30
सांगोला : भरधाव वाहनाने पाठीमागून जोराने धडक दिल्याने वेडसर महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ८.४५ च्या ...

वाहनाच्या धडकेने वेडसर महिलेचा मृत्यू
सांगोला : भरधाव वाहनाने पाठीमागून जोराने धडक दिल्याने वेडसर महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास पाचेगाव (खु) शिवारात हा अपघात घडला. कल्पना हनुमंत पाटील (वय ४५, रा. हातीद) असे या मृत महिलेचे नाव आहे.
पाचेगाव खुर्दचे पोलीसपाटील शिवप्रसाद ब्रह्मदेव रूपटक्के यांनी वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. कल्पना पाटील या एका महिन्यापासून वेडाच्या भरात गावाच्या परिसरात फिरत होत्या. दरम्यान गुरुवारी सकाळी त्या फिरत असताना अनोळखी वाहनचालकाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात तोंडास जबर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोळे गावचे पोलीसपाटील प्रवीण हातेकर यांनी माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पाचेगावचे पोलीसपाटील शिवप्रसाद रूपटक्के यांच्याशी संपर्क साधला.