शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

Coronavirus; बीएसएफच्या कॅम्पसमध्ये ५०० रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 10:28 IST

कोरोना हेल्थ केअर सेंटरची निर्मिती;विलगीकरणासाठी लोकमंगलची निवासस्थाने

ठळक मुद्दे- कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर खबरदारी -  बाधित रुग्णांसाठी ओपीडी, वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली जाणार - ५०० संशयित रुग्णांची व्यवस्था या सेंटरमध्ये करण्यात येणार 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील संशयित रुग्णांसाठी बरूर येथील बीएसएफ कॅम्पसच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या ठिकाणी ५०० रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर स्थापित करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. याबाबत तालुकास्तरीय अधिकाºयांची बैठक सोलापूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील-नाईकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, मंद्रुपच्या अतिरिक्त तहसीलदार उज्ज्वला सोरटे, बीडीओ राहुल देसाई यांच्यासह प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्याचे निश्चित झाले़ त्यासाठी तालुक्यातील सार्वजनिक इमारतींचा आढावा घेण्यात आला़ बरुर येथील बीएसएफ ट्रेनिंग सेंटरच्या कॅम्पसमधील बहुमजली इमारती त्यासाठी ताब्यात घेण्याचा निर्णय झाला़ या कॅम्पसमध्ये सात बहुमजली इमारती आहेत़  या ठिकाणी ५०० संशयित रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात एकाच ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येणार आहे़ कुंभारी, वळसंग , बोरामणी, कासेगाव या परिसरातील संशयित रुग्णांनाही याच सेंटरवर उपचारासाठी दाखल करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.

या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना संशयित तसेच बाधित रुग्णांसाठी ओपीडी, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.--------------विलगीकरणासाठी लोकमंगलची निवासस्थाने- विलगीकरणासाठी भंडारकवठे येथील लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अधिकाºयांसाठी बांधलेली निवासस्थाने सध्या रिकामी आहेत. या निवासस्थानात विलगीकरणासाठी रुग्ण ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, मात्र लोकमंगलची इमारत घेण्याबाबत संबंधितांशी अद्याप चर्चा झाली नसल्याचे उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील-नाईकडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBSFसीमा सुरक्षा दलhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय