बिटले येथे कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:03+5:302021-04-22T04:22:03+5:30

निंभोरेत १८० जणांना कोरोनाची लस करमाळा : तालुक्यात निंभोरे येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १८० जणांना ...

Corona vaccination at Beatle | बिटले येथे कोरोना लसीकरण

बिटले येथे कोरोना लसीकरण

Next

निंभोरेत १८० जणांना कोरोनाची लस

करमाळा : तालुक्यात निंभोरे येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १८० जणांना कोरोनाची लस देण्यात आली तर २२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. निंभोरे जिल्हा परिषद शाळेत हे शिबिर पार पडले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष पालखे, मेंगाळ, सावळे, सामाजिक रवींद्र वळेकर, विकास डावकर, पोलीस पाटील पन्हाळकर आदी उपस्थित होते. या शिबिरात निंभोरे, सरपडोह, गुळसडी, वरकटणे येथील ७७ स्त्रिया आणि १०३ पुरूषांना लस देण्यात आली.

उपळवाटेत जंतुनाशक फवारणी

माढा : माढा तालुक्यात उपळवाटेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी करण्यात आली. ग्रामसेवक बनाते यांच्या नेतृत्वाखाली ही फवारणी करण्यात आली. ग्रामस्थांनी या फवारणीसाठी पाणी उपलब्ध करुन दिले. गावात वडारवस्ती, मातंग वस्ती, दलित वस्ती, खुपसे गल्ली, दत्त चौक या भागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच बालाजी गरड, ग्रामपंचायत सदस्य विशाल खुपसे, प्रकाश खुपसे, अंगद शेळके, शिपाई रमेश लोहार उपस्थित होते.

बोरगाव महादेव यात्रा रद्द

अक्कलकोट : बोरगाव दे. येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होणारा ग्रामदैवत महादेव यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय यात्रा पंच कमिटीने घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने बैठक घेतली. यावेळी यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच विलास सुरवसे, सदस्य ज्ञानेश्वर पाटील, मोहन फुलारी, राजाभाऊ पाटील, दत्तात्रय जिरगे, शिवानंद किवडे, राजेभाई मुजावर, लक्ष्मण भैरामडगी, प्रा. प्रकाश स्वामी, सदस्य महमद पठाण उपस्थित होते.

कृषी पर्यवेक्षकपदी अनिल देशमुख

माढा : तालुक्यातील धानोरे देवी येथील तालुका कृषी कार्यालयातील प्रभारी मंडल कृषी अधिकारी अनिल तुकाराम देशमुख यांची पुणे विभागीय कृषी पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सन २००१ मध्ये पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यात नियुक्ती झाली होती.

चिखलठाण येथे कोरोना लसीकरण

करमाळा : तालुक्यात चिखलठाण येथे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जेऊर भागातील नागरिकांना हे लसीकरण गैरसोयीचे होते म्हणून चिखलठाण येथे शिबिर घेण्यात आले. ग्रामपंचायतीने येथील प्राथमिक शाळेत लसीकरण शिबिर घेतले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच चंद्रकांत सरडे यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीव कवितके, पोलीस पाटील मारुती गायकवाड, मारुती जाधव, आप्पासाहेब सरडे उपस्थित होते.

रयत संघटनेने मांगीत केला शासनाचा निषेध

करमाळा : तालुक्यात मांगी येथे रयत संघटनेने सोशल डिस्टन्स पाळत शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत शासनाच्या अपयशाचा निषेध नोंदवला. रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजय बागल यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन झाले. कोरोना सहीत शेतकरी वर्ग कामगार, व्यावसायिक यांच्या सर्वच प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याची टीका बागल यांनी केली. यावेळी राजू तरटे, प्रताप क्षीरसागर, पुरुषोत्तम नरसाळे, बाळासाहेब बागल, संतोष बागल उपस्थित होते.

वैश्रागमध्ये पुन्हा अन्नदान सुरु

वैराग : बार्शी तालुक्यात वैराग येथे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालयाच्या वतीने पुन्हा अन्नदान सुरु करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अन्नदानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी दीपक आंधळकर, पोलीस स्टेशनचे अधिकारी महारुद्र परजणे, डॉ. सुहास मोटे, आनंदकुमार डुरे, शशिकांत भंगुरे, धैर्यशील खेंदाड, मनोज मिसाळ, साजिद शेख, अक्षय रोडे, सूरज भालशंकर, राजाभाऊ गीते उपस्थित होते.

मळेगावात कोरोना लसीकरण जनजागृती

बार्शी : तालुक्यात मळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर जनजागृती करण्यात आली. सरंपच संजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक शिवाजी गायकवाड, समाधान पाडुळे, दशरथ इंगाेले, अशोक माळी, विठ्ठल कोकरे, प्रशांत पटणे उपस्थित होते.

सासुरेत नदी खोलीकरणाला प्रारंभ

वैराग : बार्शी तालुक्यात सासुरे येथे नागझरी नदी सरळीकरण व खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामविकास मंडळाचे दीपक पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी झेडपी सदस्य मदन दराडे यांच्या प्रयत्नातून या कामाला सुरुवात झाली. नागझरी नदीचे दोन किलोमीटर अंतर खोलीकरण होत आहे. या कामासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यावेळी सरपंच तात्यासाहेब करंडे, श्रीकांत भारती, बाळासाहेब पाटील, रामभाऊ आवारे, रणजित करंडे, बबन शेळके, महमद शेख उपस्थित होते.

Web Title: Corona vaccination at Beatle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.