शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

रोगाशी दोन हात; कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी पॉझिटिव्ह विचार करायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:13 AM

सोलापुरातील कोरोनामुक्त पोलीस अधिकाºयाचा संदेश; नियमित व्यायाम अन् सकस आहार घेतला

ठळक मुद्दे- सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलिसाची कोरोनावर मात - पत्नीने धीर दिला अन् खात्यातील वरिष्ठांनी काळजी घेतल्याच्या भावना- ग्रामीण पोलीसांनी टॉनिक, काढा व इतर औषधे पुरविली

सोलापूर : ज्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असे समजले तेव्हा तर भीतीने गाळण उडाली. पण पत्नीने धीर दिला, पॉझिटिव्ह आहात तर पॉझिटिव्ह विचार करा. बस्स, तेव्हापासून मनोमन ठरविले अन् रुग्णालयात १७ दिवस उपचार घेऊन बरे होऊन घरी परतलो, असा अनुभव सांगत आहेत, सोलापूर ग्रामीण पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील एक सहायक फौजदार.

मे महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रामीण पोलीस मुख्यालयामधील दोन पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् यांच्या संपर्कात आलेल्या स्थानिक गुन्हे शाखा, मंद्रुप, सांगोला, बार्शी पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यात वडकबाळ येथील नाकाबंदीतील सहायक फौजदारास बरूर येथे क्वारंटाईन केल्यावर ५ मे रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कुंभारीतील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घरातील व्यक्तींची तपासणी केल्यावर पत्नी, दोन मुलींनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

पॉझिटिव्ह रिपोर्ट ऐकून आधी अंगावर काटा उभा राहिला, पण पत्नीने धीर दिला. पत्नी व मुलींना सर्दीचा त्रास होताच. त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळाल्यावर नाराज झालो. डॉक्टर, नर्स नियमित तपासणी करून औषधे देत होते. सकस आहार, नियमित व्यायाम आणि औषधोपचाराने आम्ही कोरोनावर मात केली, असेही ते म्हणाले.

अनेकांनी काळजी घेतली- मी पॉझिटिव्ह आल्याचे कळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील व इतर अधिकाºयांनी औषधोपचाराची काळजी घेतली. टॉनिक, काढा व इतर औषधे पुरविली. आता मी, पत्नी व दोन मुलींनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस