कोरोना बाधित महिलेने घेतला पंढरपुरातील रुग्णालयात तीन दिवस उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:44 IST2020-04-27T14:39:47+5:302020-04-27T14:44:48+5:30
धक्कादायक; संपर्कातील लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू

कोरोना बाधित महिलेने घेतला पंढरपुरातील रुग्णालयात तीन दिवस उपचार
पंढरपूर : मोहोळ तालुक्यातील एक महिला पंढरपुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये २१ एप्रिल रोजी दुपारी उपचारासाठी आली. त्यानंतर २२, २३ व २४ एप्रिल हे तीन दिवस ती उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल झाली होती़ या दरम्यान तिच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती गोळा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहेत.
पंढरपूर मध्ये कोरोना रुग्णावर उपचार झाल्यामुळे प्रशासनामार्फत विविध उपायोजना राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व इतर विभागाच्या अधिका?्यांची बैठक घेतली.
सध्या या रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांना प्रवेश बंदी करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या महिलेवर उपचार करणाºया डॉक्टर, परिचारिका व इतर अशा एकूण ४७ कर्मचाºयांना होमकॉरंटाईन म्हणून एका मठामध्ये ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर या लोकांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना होमकॉरंटाईन करण्याच्या अनुषंगाने नियोजन सुरू आहे.
तसेच या ४७ लोकांची पाच दिवसांमध्ये तपासणी होणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.