कोरोना अलर्ट; पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहन
By Appasaheb.patil | Updated: December 23, 2022 13:20 IST2022-12-23T13:20:13+5:302022-12-23T13:20:49+5:30
पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारेा भाविक पंढरपुरात येतात.

कोरोना अलर्ट; पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहन
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - चीनसह अन्य देशांत पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जगभरामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट झालं असून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडून भविकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारेा भाविक पंढरपुरात येतात. मुुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासह अन्य मोठमोठ्या शहरातील भाविकांची दररोज दर्शनरांगेत गर्दी असते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व काळजीसाठी मंदिर समिती सज्ज झाली असून भाविकांना मास्क घालण्यासंदर्भात आवाहन करीत आहे. कोरोना आला तरी लॉकडाऊनची शक्यता नाही.
दरम्यान, सध्या तरी मास्क वापरण्याची सक्ती केलेली नाही. पण नागरिकांनी मास्क वापरावे असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सातत्याने करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सोलापूरसह पंढरपुरातील आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या तसेच योग्य त्या उपायोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.