शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेतील धूळ नियंत्रित करण्यासाठी दिवसातून २० टँकर पाण्याची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 14:12 IST

सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील व्यापारी समाधानी : सिध्देश्वर देवस्थान पंच समितीकडून घेतली जातेय काळजी 

ठळक मुद्देनागरिकांना होम मैदान परिसरात नेहमी धुळीचा त्रास सहन करावा लागतोअनेकजण या परिसरात होणाºया धुळीमुळे गड्डा यात्रेला जाण्याचे टाळतातधुळीमुळे सर्दी, खोकला तसेच श्वसनासंदर्भातील आजाराला निमंत्रण मिळते

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : लहानांपासून मोठ्यांचे आकर्षण असणारी गड्डा यात्रा सध्या होम मैदानावर भरली आहे. गड्डा यात्रेत धुळीचा त्रास होत असतो. यावर उपाय म्हणून मंदिर समिती होम मैदानावर दिवसातून दोनदा पाण्याचा फवारा करत आहे. यामुळे मैदान व परिसरातील होणाºया धुळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

नागरिकांना होम मैदान परिसरात नेहमी धुळीचा त्रास सहन करावा लागतो. अनेकजण या परिसरात होणाºया धुळीमुळे गड्डा यात्रेला जाण्याचे टाळतात. धुळीमुळे सर्दी, खोकला तसेच श्वसनासंदर्भातील आजाराला निमंत्रण मिळते. अस्थमा आजाराचा त्रास असणाºया नागरिकांना धुळीचा सर्वात जास्त त्रास होत असतो. नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी त्यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. मंदिर समितीतर्फे नागरिक व व्यापाºयांना त्रास होऊ नये यासाठी टँकरद्वारे होम मैदानावर पाणी फवारण्यात येत आहे. दिवसातून दोनदा रोज आठ ते दहा असे दिवसातून १६ ते २० टँकरमधील पाणी होम मैदान व परिसरात फवारले जात आहे. सकाळी व दुुपारी असे दोनदा पाणी फवारल्यामुळे धुळीवर बºयाचअंशी नियंत्रण मिळविता आले आहे.

महापालिकेतर्फे स्वच्छतागृहाची व्यवस्था - मंदिर समितीतर्फे होम मैदानावर पाणी फवारण्यात येत आहे. यामुळे माती कमी प्रमाणात उडत असून आम्हाला धुळीचा खूप कमी त्रास होत आहे. मंदिर समितीतर्फे नागरिक व व्यापाºयांसाठी काळजी घेण्यात येत असल्याची प्रतिक्रिया एका व्यापाºयाने दिली. गड्डा यात्रा परिसरात महापालिकेतर्फे स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मैदानावर लाल रंगाच्या मातीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांहून होमकट्ट्याकडे येण्यासाठी चार रस्ते हे लाल रंगाची माती टाकून तयार करण्यात आले आहे. यामुळे तसेच विविध प्रकारच्या रोषणाईने होम मैदानाला आकर्षक रुप आले आहे.

यंदाच्या यात्रेमध्ये लेसर शोचा वापर करण्यात आला. यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळविता आले. तसेच मैदानावर पाणी फवारल्यामुळे धुळीचा त्रास कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे गड्डा यात्रेतील व्यापारी व नागरिक समाधानी आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत - भीमाशंकर पटणे अध्यक्ष, यात्रा समिती

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण