शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

करकंब येथे चोरटी वाळू वाहतूक रोखली; ट्रकसह सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

By appasaheb.patil | Updated: March 25, 2023 17:30 IST

पंढरपूर तालुक्यातील करकम येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली.

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील करकम येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली. वाळू चोरी करणाऱ्या ट्रकसह सव्वा पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप त्यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करीत असताना पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या टिमला बातमीदाराकडून बातमी मिळाली की, शिरढोण (ता. पंढरपूर) येथील भिमा नदीच्या पात्रातून काही इसम शासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना वाळूचे उपसा करून चोरून वाळू वाहतूक व त्याची विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी पथकासह मौजे भोसे, (ता. पंढरपूर जि. सोलापूर) येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी पहाटेच्या सुमारास मौजे भोसे पाटी जवळून पंढरपूर ते करकंब जाणा-या रस्त्यावरून एक हायवा ट्रक भरधाव वेगाने करकंबच्या दिशेने जाताना दिसला. त्याचा आम्हांस संशय आल्याने लागलीच त्याचा पाठलाग करून सदरचे वाहन पकडून चेक केले असता, सदर वाहनाच्या पाठीमागील हौदामध्ये एकूण ४ ब्रास वाळू मिळून आली. चालकाकडे सदरबाबत विचारपूस केली असता सदरची वाळू ही शिरढोण ता. पंढरपूर येथून भिमानदीच्या पात्रातून काढलेली वाळू विक्री करीता घेवून जात असलेबाबत सांगितले. सदर वाळूवाहतूकी बाबत त्याचेकडे परवानाबाबत विचारपूस केली असता त्याचेकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे हायवा ट्रकसह चालकास ताब्यात घेवून एकूण 15 लाख 28 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून  करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, बिराजी पारेकर, पोलीस अंमलदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे यांनी बजावली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर