A container carrying a traveler and a suitcase bag caught fire | ट्रॅव्हलर अन् सुटकेस बॅगा घेऊन जाणाºया कंटनेरला लागली आग

ट्रॅव्हलर अन् सुटकेस बॅगा घेऊन जाणाºया कंटनेरला लागली आग

ठळक मुद्दे- मोहोळ-विजयपूर रोडवरील कामती येथील घटना- आगीची माहिती मिळताच कामती पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल- आग विझविण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांची घेतली मदत

सोलापूर : मोहोळ - विजयपूर महामार्गावर कुरुल येथे विजयपूरकडे व्हीआयपी सुटकेस घेऊन जाणाºया कंटेनरला अचानक आग लागली.

आग लागल्याची माहिती मिळताच कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी तातडीने सोलापूर महानगरपालिकाचा अग्निशमन पंप बोलावून घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिकहुन चेन्नईकडे जात असलेला (एचआर ५५ झेड ८१३१) या क्रमाकांचा ट्रान्सपोर्ट कार्गो टेलर हा ट्रॅव्हलर व सुटकेस बॅगा घेऊन जात होता. 

 मोहोळ-विजयपूर मार्गावरील कुरूल हद्दीत या गाडीला अचानक आग लागली़ या आगीची माहिती मिळताच पोलीसांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले़ याचवेळी पोलीसांनी सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केले़ पाण्याचा जास्तीचा फवारा करीत आग आटोक्यात आणली़ या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचेही पोलीसांनी सांगितले.


 

Web Title: A container carrying a traveler and a suitcase bag caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.