शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

काँग्रेस म्हणते, हा तर सुशीलकुमारांचाच प्रकल्प; शिवसेनेच्या नेत्यांमध्येही उड्डाण पुलावरुन दोन गट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 11:57 IST

कशी फुटणार कोंडी : कोठेंनी यापूर्वी विरोध नोंदवला, कधी मिळणार निधी

ठळक मुद्देउड्डाण पुलाच्या भूसंपादनाचे काम संथगतीने सुरू सरकार बदलल्यानंतर काँग्रेसने या प्रकल्पाला थेट विरोध केलाशहरातील वाहतुकीची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचेल का?

राकेश कदम 

सोलापूर : शहरात उड्डाण पूल गरजेचा आहे. मूठभर लोकांच्या मिळकती बाधित होतील म्हणून त्याला विरोध करणे चुकीचे आहे, असे भाजपचे नेते बोलत आहेत. हा तर सुशीलकुमार शिंदे यांचा प्रकल्प होता. पण आता त्याला प्राधान्य नको, असे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. शिवसेनेत या विषयावरुन दुफळी आहे. राष्ट्रवादी पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी आवश्यक निधी कसा मिळणार, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. 

उड्डाण पुलाच्या भूसंपादनाचे काम संथगतीने सुरू आहे. राज्यातील सरकार बदलल्यानंतर काँग्रेसने या प्रकल्पाला थेट विरोध केला आहे. त्यामुळे भविष्यात भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी मिळेल की नाही, याची चर्चा सुरू आहे. उड्डाण पुलाच्या कामात अनेक आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकती बाधित होणार आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप नगरसेवकांचाही समावेश आहे. दोन देशमुखांनी पुढाकार घेतल्याने भाजपचे नगरसेवक यावर फार बोलायला तयार नाहीत. शिवसेनेत मतभेद दिसत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा मनपातील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी महापालिकेच्या सभेत उड्डाण पुलास विरोध केला आहे. सेनेचे इतर नगरसेवक मात्र उड्डाण पुलाच्या बाजूने आहेत. या गोंधळात शहरातील वाहतुकीची वस्तुस्थिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचेल का? पोहोचली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इतर नेते त्याला साथ देतील का?, अशीही चर्चा आहे. 

ठोंगे-पाटील, वानकर म्हणाले, आम्ही पाठपुरावा करू - शहरात उड्डाण पूल गरजेचा आहे. साखर कारखाने, सिमेंट कारखाने, मेडिकल हब यामुळे शहरात वाहनांची गर्दी वाढत राहील. आज केंद्र सरकारने पैसे दिलेत. उद्या किंमत वाढल्यास मिळतील की नाही याची शाश्वती नाही. मग कशाला विरोध करायचा. आमच्यातील काही लोक शहर विकासाऐवजी नातेवाईकांच्या हिताला प्राधान्य देतात. नातेवाईकांच्या जमिनी जातील म्हणून काही लोक विरोध करीत आहेत. हे बरोबर नाही. - लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना. 

 उड्डाण पुलाचे भूसंपादन सुरू झाले. ते कशाला थांबवायचे. प्रथम बाह्यवळण रस्ते व्हायला हवेत. त्यासोबत उड्डाण पुलाचे काम थांबू नये. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला उर्वरित निधी आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊ. गणेश वानकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसroad transportरस्ते वाहतूक