फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची विवाहितेची तक्रार
By विलास जळकोटकर | Updated: January 16, 2024 18:00 IST2024-01-16T17:59:04+5:302024-01-16T18:00:05+5:30
पीडितेचा पती भोळसर असल्याचा फायदा घेत आरोपी १ डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला.

फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची विवाहितेची तक्रार
सोलापूर : भोळसर नवरा असल्यानं विवाहितेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिच्याशी ओळख वाढवून फसवून रिक्षामधून लॉजवर नेले आणि जबरदस्तीचं अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेनं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानापूरे याच्याविरुद्ध भा. द. वि. ३७६ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पीडिता शहरातील एका पेठेत राहते. ती राहत असलेल्या परिसरात वरील आरोपीची पीडित व तिच्या पतीशी ओळख झाली. पीडित व तिचे पती हाऊसकिपिंगचे काम करुन कुटुंबाची गुजराण करतात.
पीडितेचा पती भोळसर असल्याचा फायदा घेत आरोपी १ डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला. तेथून महत्त्वाचे काम आहे म्हणून रिक्षातून एका लॉजवर नेले. तेथे ‘तू मला आवडतेस, तुझा नवरा भोळसर आहे. मी तुझा सांभाळ करतो’ असे म्हणत जबरदस्तीने मारहाण करुन अत्याचार केला. त्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत वारंवार धमकी देऊन त्याने असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी गु्न्हा दाखल होताच सहा. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वना सिद, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख, यांनी पिडितेची भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेऊघाले करीत आहेत.