सोलापूरमध्ये सोशल मीडियावर ओळख वाढवून स्पर्धा परीक्षार्थी मुलीवर अत्याचार
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 28, 2023 15:06 IST2023-05-28T15:05:23+5:302023-05-28T15:06:18+5:30
पीडित मुलगी ही २०१७ पासून पुणे शहरात होस्टेलवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती.

सोलापूरमध्ये सोशल मीडियावर ओळख वाढवून स्पर्धा परीक्षार्थी मुलीवर अत्याचार
सोलापूर : पुणे येथे होस्टेलवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या मुलीशी सोशल मीडियावरुन ओळख वाढवून लग्नाच आमिष दाखवत अत्याचार केला. तसेच हॉटेल टाकण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन पीडितेची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी श्रीकृष्ण वसंत तौर उर्फ बाळराजे पाटील (रा.आरणगाव ता.परांडा, जि.धाराशिव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीने पोलीसात २७ मे रोजी तक्रार देताच गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३० डिसेंबर २०२२ ते ५ मार्च २०२३ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित मुलगी ही २०१७ पासून पुणे शहरात होस्टेलवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची श्रीकृष्ण तौरसोबत ओळख झाली. सप्टेंबर २०२२ मध्ये समक्ष भेटून त्याने स्वत:चे राजकीय व्यक्तीशी संबंध असून सांगत तो तिला खूप आवडतेस म्हणाला. तसेच परांड्यात हॉटेल टाकणार आहे असे सांगत पैशाची मागणी केली. पीडितेंनी तीन लाख रुपये दिले. त्यानंतर तिने मानलेल्या भावाची ओळख करून दिली. त्यास काँट्रॅकटची कामे मिळवून देतो म्हणून दोन लाख घेतले.
पीडितेने गुगलपेवरून २ लाख ४० हजार रुपये घेतले. याच दरम्यान त्याने लग्नाचे अमिश दाखवून पुण्यात व बार्शीत तिच्यावर दुष्कर्म केले. त्यावेळी त्याने फोटोही काढून ठेवले होते. त्यानंतर मानलेल्या भावास काम देईना आणि घेतलेले पैसेही परत देईना. त्यानंतर पीडितेने विवाहाबद्दल विचारले असता स्वत:चा विवाह झालेला असून दोन मुले असल्याचे सांगितले. पोलीसात तक्रार दिल्यास तुझे फोटो व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिली.