शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सहकारी संस्थांचा वापर गरिबांसाठी झाला नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची खंत, माळकवठे येथे कृषी अवजारांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:49 PM

शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी माळकवठे येथे बोलताना व्यक्त केली. 

ठळक मुद्देमाळकवठे येथील सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत शेतकºयांना २० ट्रॅक्टर, २० कृषी पंप, २० पीव्हीसी पाईप संच, भाजी-पाल्यासाठी ५०० कॅरेटस्चे वितरणयेत्या वर्षभरात राज्यातील पाच हजार विकास सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न : सहकार मंत्री

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी माळकवठे येथे बोलताना व्यक्त केली. माळकवठे येथील सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत शेतकºयांना २० ट्रॅक्टर, २० कृषी पंप, २० पीव्हीसी पाईप संच, भाजी-पाल्यासाठी ५०० कॅरेटस्चे वितरण सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माळकवठे विकास सोसायटीच्या वतीने ठेवी स्वीकारण्याचा शुभारंभ तसेच सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासकीय हमीभावात तूर खरेदी केंद्र सुरू असून १०१ मे.टन पोत्याचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील होत्या. व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, आत्माचे संचालक विजयकुमार बरबडे, उपसभापती संदीप टेळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जि. प. सदस्य आण्णाराव बाराचारे, प्रभावती पाटील, पं. स. सदस्य महादेव कमळे, शशीकांत दुपारगुडे, रेखा नवगिरे, सोनाली कडते यांची उपस्थिती होती.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हणमंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, कंपनीच्या प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, येत्या वर्षभरात राज्यातील पाच हजार विकास सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. अनुदानातून नाही तर शेतकºयांच्या योगदानातून सहकारी संस्थांचा आणि गावांचा विकास होऊ शकतो. तालुक्यात गेल्या ७० वर्षांत अवघे १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ६७ टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे. वाळू वाहतुकीने रस्त्यांची चाळण झाली तरीही विरोधकांना या तालुक्यासाठी काही करावेसे वाटले नाही. समाजाला अज्ञानात ठेवण्यातच धन्यता मानणाºयांनी स्वार्थी राजकारणापलीकडे पाहिलेच नाही, असा टोला त्यांनी लगावला. या कार्यक्रमास हंजगीचे आरकेरी महाराज, डॉ. चनगोंडा हविनाळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रशांत कडते, टाकळीच्या सरपंच सुशीला ख्यामगोंडे, शिरीष पाटील, भीमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील, मायप्पा व्हनमाने, शरीफ शेख, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, मद्रेच्या सरपंच विजयालक्ष्मी होनमाने, यतीन शहा, तांदुळवाडीचे सरपंच सिद्धाराम हेले, तालुका कृषी अधिकारी श्रीधर गावंडे, सहायक निबंधक बालाजी वाघमारे, प्राचार्य विश्रांत गायकवाड, सचिन पाटील, माळकवठेचे सरपंच शिवलिंग बगले, उपसरपंच शकिला शेख, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब सगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकुमार साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. -----------------------------लोकमंगलला पर्याय द्या..- लोकमंगल ही एक चळवळ आहे. वृद्ध, निराधार माता-पित्यांच्या मुखात दोन घास प्रेमाने भरविणारी ही संस्था आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यातून गरजू गरिबांना आधार देणारी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी सातत्याने धडपडणारी ही संस्था समाजाच्या उद्धारासाठी काम करते. तिला संपविण्याची भाषा करण्याऐवजी या संस्थेला पर्याय देणारी संस्था उभारा, अशा शब्दात सहकार मंत्री देशमुख यांनी आ. प्रणिती शिंदे यांनी निंबर्गीत केलेल्या वक्तव्याला नाव न घेता प्रत्युत्तर दिले. -------------------------लोण्याच्या गोळ्यासाठी एकी- साडेतीन वर्षांत एकमेकांची तोंडे न बघणारी नेतेमंडळी आता एकत्र आली आहेत. विकासकामासाठी नाही, जनतेच्या भल्यासाठी नाही तर बाजार समितीच्या लोण्याचा गोळा घशात घालण्यासाठी ते एकत्र आले आहेत. त्यांनी शेतकºयांसाठी आजपर्यंत काय केले? याचे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. निवडणुकीत त्यांना जाब विचारा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख