बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार

By रवींद्र देशमुख | Updated: January 19, 2024 12:37 IST2024-01-19T12:37:34+5:302024-01-19T12:37:59+5:30

सोलापूरजवळील कुंभारी येथे रे नगरच्या उद्‌घाटनासाठी तसेच कामगारांना घरे देण्यासाठी मोदी सोलापुरात आले असून, त्यांच्या सभेत प्रारंभी शिंदे बोलत होते.

CM Eknath shinde in solapur Bole taisa chale is the Modi guarantee, said Chief Minister Eknath Shinde | बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार

बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला शब्द पूर्ण करतात. त्यांनी दिलेल्या वचनानुसार रेनगरातील पंधरा हजार कामगारांना घरांच्या चाव्या दिल्या..‘बोले तैसा चाले..त्याची वंदावी पाऊले’ असेच मोदी यांच्याबाबत बोलावे लागेल..त्यांचे शब्द हीच मोदी गॅरंटी असते, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

सोलापूरजवळील कुंभारी येथे रे नगरच्या उद्‌घाटनासाठी तसेच कामगारांना घरे देण्यासाठी मोदी सोलापुरात आले असून, त्यांच्या सभेत प्रारंभी शिंदे बोलत होते. मोदी यांनी समृध्दी महामार्ग, अटल सेतू, दोन मेट्रोलाईन्सचा शिलान्यास केला होता. त्यांचे उद्‌घाटनही मोदी यांनीच केले आहे. हे मोदी यांच्या गॅरंटीचे द्योतक आहे. आगामी पंतप्रधान मोदी हेच होतील व राज्यात महायुतीचे सरकार येईल असेही ते म्हणाले.

Web Title: CM Eknath shinde in solapur Bole taisa chale is the Modi guarantee, said Chief Minister Eknath Shinde