सोलापुरातील पोलीसांना शिवीगाळ करून चौकीची तोडफोड; नगरसेवकासह चौघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:10 IST2018-10-24T12:09:50+5:302018-10-24T12:10:55+5:30

सोलापूर : बेगमपेठ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना शिवीगाळ करून चौकीत तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवक ...

Chowki foiled by shielding police in Solapur; Police constable with four constables, including the corporator | सोलापुरातील पोलीसांना शिवीगाळ करून चौकीची तोडफोड; नगरसेवकासह चौघांना पोलीस कोठडी

सोलापुरातील पोलीसांना शिवीगाळ करून चौकीची तोडफोड; नगरसेवकासह चौघांना पोलीस कोठडी

ठळक मुद्दे पोलीस उपनिरीक्षक लिगाडे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली फिर्यादया प्रकरणी आरोपीकडून अ‍ॅड. रियाज शेख हे काम पाहात आहेत

सोलापूर: बेगमपेठ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना शिवीगाळ करून चौकीत तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवक तौफिक हत्तुरेसह चौघांना न्यायाधीश के.के. पाटील यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक लिगाडे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नगरसेवक तौफिक हत्तुरे, अझरुद्दीन हत्तुरे अन्य दोन अशा चौघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लिगाडे यांनी अझरुदीनला चौकीत बोलावले, तू त्याला चौकीत कशासाठी बोलावले? फोन का केला? म्हणून नगरसेवक तौफिक याने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुकी केली होती.

तसेच पोलीस चौकीतील काही सामानांची तोडफोड केल्याचे पोलीस उपनिरीक्षक लिगाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपीकडून अ‍ॅड. रियाज शेख हे काम पाहात आहेत. 

Web Title: Chowki foiled by shielding police in Solapur; Police constable with four constables, including the corporator