ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 23:34 IST2018-12-24T23:34:39+5:302018-12-24T23:34:51+5:30
उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून सहावीतील कल्याण संभाजी वाघे या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
सोलापूर - उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून सहावीतील कल्याण संभाजी वाघे या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर-पुणे मार्गावर टेंभुर्णीपासून दोन किलोमीटर अंतरावरील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
टेंभुर्णी येथील वाघे वस्तीमध्ये राहणारा कल्याण वाघे हा बारा वर्षीय मुलगा शाळा संपल्यावर टेंभुर्णी-इंदापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून सायकलने घरी निघाला होता. घर अर्धा किलोमीटर अंतरावर असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरची (क्र. एम.एच-१३ ए जे.०८७८) जोरदार धडक बसली. यामुळे ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून कल्याण जागीच ठार झाला.
ती ठरली अखेरची भेट
कल्याण येथील टिष्ट्वंकल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये सहावीत शिकत होता. या दुर्घटनेच्या अगदी दहा मिनिटांपूर्वी त्याची वडिलांशी भेट झाली होती. ती मुलासोबतची अखेरची भेट असेल असे कुणालाही वाटले नाही, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.