छगन भुजबळ यांचा आज पंढरपुरात मुक्काम; उद्या ओबीसी एल्गार सभेला लावणार हजेरी
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 5, 2024 15:21 IST2024-01-05T15:20:40+5:302024-01-05T15:21:40+5:30
शासकीय वाहनाने मंत्री भुजबळ हे आज दुपारी चार वाजता सांगलीहून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.

छगन भुजबळ यांचा आज पंढरपुरात मुक्काम; उद्या ओबीसी एल्गार सभेला लावणार हजेरी
सोलापूर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे शुक्रवारी, ५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पंढरपुरात येत आहेत. रात्री त्यांचा पंढरपुरात मुक्काम असून उद्या ते पंढरपुरात आयोजित ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेला हजेरी लावणार आहेत.
शासकीय वाहनाने मंत्री भुजबळ हे आज दुपारी चार वाजता सांगलीहून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. रात्री ८ दरम्यान त्यांचे पंढरपुरात आगमन होईल. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम असून उद्या दुपारी ४ वाजता पंढरपुरात आयोजित ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेला ते हजेरी लावणार आहेत.