नव्या वर्षाच्या पहाटे सोलापुरात चाेरी; सलूनचे दुकान फोडून रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 15:22 IST2021-01-01T15:22:27+5:302021-01-01T15:22:34+5:30

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती; चोरट्याचा तपासासाठी पोलिस पथके

Chari in Solapur on New Year's morning; Cash lamps broke into the salon shop | नव्या वर्षाच्या पहाटे सोलापुरात चाेरी; सलूनचे दुकान फोडून रोकड लंपास

नव्या वर्षाच्या पहाटे सोलापुरात चाेरी; सलूनचे दुकान फोडून रोकड लंपास

सोलापूर - नव्या वर्षाच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास अशोक चौक परिसरात असलेल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर असलेल्या हेअर अफेअर या सलूनचे दुकान चोरट्यांनी फोडून ३८ हजाराची रोख रक्कम व एक मोबाईल चोरून नेला आहे. याबाबतची माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज मिळविला आहे. 

दरम्यान, दोन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात येते. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिस दलाकडून तपास करण्यात येत आहे. लवकरच चोरटे जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी सलून चालकांना दिला आहे. 

Web Title: Chari in Solapur on New Year's morning; Cash lamps broke into the salon shop