शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates : मतदान उत्साहात सुरू; पण अनेक ठिकाणी EVM बंद, गोंधळाची स्थिती
2
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
3
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
4
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
5
मीरारोड येथील मतदान केंद्रात भाजपचे केंद्र प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या नावांचे कार्ड लाऊन बसले
6
गोंधळच गोंधळ...! नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ, मतदान यंत्रातही बिघाड, सुरुवातीला संथ गतीने मतदान 
7
"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया
8
अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्यांना सापडला खजिना; 'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल'ला सापडले तेलाचे नवीन साठे
9
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
10
मस्क यांच्यावर डॉलर्सचा पाऊस, एकाच दिवसात संपत्तीत ४२.२ अब्ज डॉलर्सची वाढ
11
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
12
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
13
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
14
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
15
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
16
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
17
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
18
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
19
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
20
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

बदलती सामाजिक मानसिकता धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक : जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:32 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक ...

ठळक मुद्देपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली  अर्पणजवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवछत्रपती रंगभवन येथे सांस्कृतिक दहशतवादविरोधी परिषद

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक मानसिकता बदलत आहे. ती या धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. 

येथील जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवछत्रपती रंगभवन येथे गुरुवारी सायंकाळी सांस्कृतिक दहशतवादविरोधी परिषद घेण्यात आली. या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक सर्फराज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कॉम्र्रेड रवींद्र मोकाशी होते. 

आव्हाड यांनी सुरुवातीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली  अर्पण केली.  काश्मिर देशातील राजकारणाचा भाग झाला आहे. मोदी सरकारने काश्मिरी युवकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. उलट या भागात सामाजिक अस्वस्थता वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

काश्मिर वाचविण्यासाठी जे जे करता येईल ते करायला हवे. नरेंद्र मोदी इस्राईलला गेले. मुंबई हल्ल्यातून वाचलेल्या लहान मुलाला भेटले. पण उत्तर प्रदेशातील अखलाक किंवा पोलीस निरीक्षक सुबोधसिंग याच्या मुलाला भेटले नाहीत. सोलापुरातील मोहसीन शेखच्या कुटुंबीयांना भेटायला आले नाहीत. दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधान जाळण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हे सर्व ठरवून केले जात आहे. सातत्याने संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. 

तर मीही अर्बन नक्षलवादी...- आव्हाड म्हणाले, अत्यंत क्रूर पद्धतीने शासन व्यवस्था चालविली जात आहे. अर्बन नक्षलवादी म्हणून आंबेडकरी चळवळीला बदनाम केले जात आहे. येथील वर्णव्यवस्थेत पिचलेल्यांच्या बाजूने बोलणं जर अर्बन नक्षलवाद असेल तर मला अर्बन नक्षलवादी म्हणून घ्यायला काहीही वाटणार नाही. ही बदनामी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNCPराष्ट्रवादी काँग्रेस