महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदला, प्रणिती शिंदे यांची भिडे गुरूजींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 13:55 IST2022-11-03T13:54:31+5:302022-11-03T13:55:00+5:30

आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बाेलताे, असा सल्ला संभाजी भिडेंनी दिला होता.

Change the mindset towards women Praniti Shinde s criticism of sambhaji Bhide comment | महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदला, प्रणिती शिंदे यांची भिडे गुरूजींवर टीका

महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदला, प्रणिती शिंदे यांची भिडे गुरूजींवर टीका

राकेश कदम
महिलांचे काम आणि त्यांचे कर्तृत्व बघा. केवळ त्यांच्या चेहऱ्यांकडे बघून भेदभाव करण्याची मानसिकता बदला, असं म्हणत काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर टीका केली.

मुंबईतील एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना प्रश्न विचारला हाेता. या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बाेलताे, असा सल्ला दिला हाेता. आमदार प्रणिती शिंदे गुरुवारी भारत जाेडाे यात्रेतील सहभागाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना भिडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली.

महिलांना ऑब्जेटिव्ह म्हणून बघणे बंद करा. अमूक गाेष्ट करा म्हणून सांगणारे  हे काेण आहेत? भाजपचे लोक आम्हाला देश प्रेमाबद्दल सांगतात. आमचे देशप्रेम हृदयात आहे. आम्हाला दाखवायची गरज नाही. भाजपच्या लाेकांनी महिलांबद्दलची मानसिकता बदलावी.हे लाेक  महिलांचे काम आणि कर्तृत्व बघत नाही. केवळ त्यांच्या चेहऱ्यावर बघून विधाने करतात. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत, असे शिंदे म्हणाल्या.

Web Title: Change the mindset towards women Praniti Shinde s criticism of sambhaji Bhide comment