शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

पंढरपुरातील चंद्रभागा नदी कोरडी; स्नान होत नसल्याने भाविक निराश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:12 IST

विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो.

ठळक मुद्देडबक्यातील पाणी गढूळ : प्रशासन, मंदिर समितीने सोय करण्याची आवश्यकताविठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतोपाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाही़ दूरवरून आलेल्या भाविकांची निराशा होते़

प्रभू पुजारी पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन शेकडो किमीचे अंतर पार करून विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो, मात्र सध्या चंद्रभागा नदीपात्र कोरडे पडले आहे़ त्यामुळे पाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाही़ दूरवरून आलेल्या भाविकांची निराशा होते़ नदीपात्रातील डबक्यातील पाणीही गढूळ आहे. प्रशासन आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या स्नानासाठी सोय करावी, अशी मागणी खुलताबाद येथील ज्ञानेश्वर मोठ्ठे यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेल्या मोठ्ठे परिवाराने केली.

पंढरपूरच्या चार मोठ्या वारी सोहळ्यादरम्यान चंद्रभागा नदीपात्रात पाणी नसले तरी प्रशासन पाणी सोडून भाविकांची सोय करते़ परंतु पंढरपुरात रोज किमान ३० हजारांपेक्षा जास्त भाविक येतात़ त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी राहावे याची सोय करणे गरजेचे आहे़, असे भाविकांचे म्हणणे आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे़ उजनी धरण १०० टक्के भरले आहे़ मात्र सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी कमी पडल्यानंतर आणि मागणी झाल्यावर भीमा नदीत पाणी सोडले जाते़ ते पाणी चंद्रभागा नदीत आल्यानंतर किमान भाविकांच्या स्नानासाठी अडविले पाहिजे़ ही भाविकांची मागणी लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी गोपाळपूर येथे बंधारा बांधण्यास परवानगी दिली आणि काही कालावधीत त्याची उभारणी करण्यात आली़ पण पाणी असल्यानंतर वाळू उपसा करता येत नाही, म्हणून वाळू चोर तेथील बंधाºयाचे दरवाजे उघडतात आणि पाणी वाहून जाते़ याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़ जानेवारी महिन्यात पाणी सोडण्यात आले होते़ तेच पाणी आतापर्यंत नदीपात्रात होते़ आता उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि ते पाणी खाली वाहून गेल्याने चंद्रभागा नदी कोरडी पडली आहे.

नदीपात्रात काही ठिकाणी डबक्यात पाणी आहे, मात्र तेथे स्थानिक लोक पैसे शोधण्यासाठी फिरत असल्याने ते पाणी गढूळ होते़ त्यामुळे त्या डबक्यात पवित्र स्नान करण्याची मानसिकता होत नसल्याचे भाविकांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरriverनदीwater shortageपाणीटंचाई