सोलापुरातील 'कोरोना'ची परिस्थिती पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 09:16 IST2020-04-26T09:11:49+5:302020-04-26T09:16:45+5:30
सोलापूर शहरातील हॉटस्पॉट ची करणार पाहणी; 'कोरोना'बाबत घेणार आढावा...!

सोलापुरातील 'कोरोना'ची परिस्थिती पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल...!
ठळक मुद्देसोलापुरातील हॉटस्पॉटची करणार पाहणीकेंद्रीय पथकाबरोबर बरोबर राज्याचे अधिकारी राहणार उपस्थितजिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन सज्ज
सोलापूर: सोलापुरातील 'कोरोना' साथीची परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी सकाळी सोलापुरात दाखल होत आहे.
सोलापुरात 13 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतरच्या 12 दिवसात रुग्णांची संख्या 50 वर गेली. यातील चार रुग्ण दगावले आहेत. यात सारीचे रुग्ण आढळले आहेत. सारी आणि कोरोनाचाही प्रभाव सोलापूरात जाणवत आहे. याची कारणे तपासण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी सकाळी सोलापुरात दाखल होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोलापुरात कोरोणाचा रुग्ण जेथे आढळला, त्या तेलंगी पाच्छा पेठेपासून हे पथक इतर दहा हॉटस्पॉटची पाहणी करणार आहे.