शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Marathi Language Day; केंद्राची दुटप्पी भूमिका, वेळकाढूपणामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही

By appasaheb.patil | Published: February 27, 2019 10:30 AM

आप्पासाहेब पाटील सोलापूर : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे जवळपास सर्व प्रयत्न महाराष्ट्र ...

ठळक मुद्देसरकारच्या कारभारावर साहित्य वर्तुळातून नाराजीचा सूर सर्व गोष्टींची पूर्तता करूनही मराठीला अभिजात दर्जा का नाही ?अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरुप मिळण्याची वेळ आली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे जवळपास सर्व प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण झालेत....आता बाकी आहे ती फक्त केंद्र सरकारकडून घोषणेची...अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरुप मिळण्याची वेळ आली आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीने पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केलाय. आतापर्यंत केंद्राने तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा दर्जा दिलाय. पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नेमका कोणत्या कारणासाठी राहिलेला आहे हे मात्र समजायला अवघड आहे़ शासनाची दुटप्पी भूमिका, केंद्राकडे पाठविलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष व पाठपुरावा या कारणामुळे अभिजात दर्जा अद्याप मिळालेला नसल्याने साहित्यिकांनी केंद्र सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

राजकीय अजेंडा समोर ठेवून शासनकर्ते आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने प्रक्रिया सुरू करतात; मात्र मराठी भाषा धोरणाबद्दल, त्याला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत उदासीनता दाखवित आहेत.त्याबद्दल एक शब्दही उच्चारायला तयार होत नाही. याचे कारण शासनाला भाषा धोरण जाहीरच करायचे नाही. मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे दाखविण्यासाठी शासन मराठी भाषा दिनी असंख्य उपक्रम हाती घेते; मात्र गेल्या दीड वर्षापासून कागदावरच राहिलेल्या भाषा धोरणाच्या अंमलबजावणीकडे डोळेझाक करते. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाºया शासनाच्या कारभारावर साहित्य वर्तुळातून नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत बोलताना ज्येष्ठ साहित्यिक गो़मा़ पवार म्हणाले की, शासनाने अभिजात दर्जा देण्यासाठी लावलेले निकष योग्य नाहीत़ भाषेचा वापर, परंपरा, दर्जा दिल्यानंतर होणारा परिणाम आदी गोष्टींचा विचार करण्यापेक्षा वेगळ्याच प्रकारचे निकष लावण्यात येत आहेत़ 

मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळत नाही हे सागणं कठीण आहे़ अभिजात दर्जा देणं अवघड नाही़ दर्जासाठी लागणाºया सर्व अटींची पूर्तता केली़ अहवाल दिला, साहित्यिकांची कमिटी केली, ठराव केले, सह्यांची मोहीम घेतली तरीही शासनाकडून मराठी भाषेला सन्मान दिला जात नाही़ याबाबत शासनाची तज्ज्ञ समिती निर्णय घेणार आहे पण त्यांना कोणती अडचण येत आहे हेही कळायला तयार नाही़ दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे हे मात्र नक्की- प्रा़ सुहास पुजारी, मराठी अभ्यासक, सोलापूर

मराठी भाषेचे निकृष्टीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे़ अनेकांना मराठी भाषा येत नाही, हे सत्य आहे़ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नाहीत़ लहान मुलांना शाळेत टाकण्यापेक्षा इतर गोष्टीत इंग्रजीचा आग्रह धरण्यात येत आहे़ गरिबातील गरीब माणूसही आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतील शिक्षण देत आहे़ शासनाचा वेळकाढूपणा व शरद पवार या दोघांमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसल्याची खंत आहे़- दत्ता गायकवाड,साहित्यिक, सोलापूर

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही याबाबत खंत करण्यापेक्षा मराठी भाषेचा विकास वेगवेगळ्या अंगाने करता येतो हे सत्य आहे़ शिक्षणाचे माध्यम मराठी हे तात्विक आहे़ भाषेच्या वापराने भाषा समृद्ध होते़ मराठीचा वापर वेगाने करायला हवा़ भाषा ही सरकारी अनुदानातून समृद्ध होत नाही़ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायलाच हवा़ शासनाकडून मराठी भाषेवर होत असलेला अन्याय योग्य नाही़ तरी शासनाने लवकरात लवकर दर्जा मिळवून द्यावा़- गो़मा़ पवार, ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन