शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सावधान; मोबाईलवरून फोटो पाठवला एक; पाहायला गेलो की दुसरीच मुलगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 17:46 IST

ऑनलाईन जोडीदार शोधताय, सावधान..! : फोटोसाठी मोबाईलवरील फिल्टरचा वापर

सोलापूर : ऑनलाईन वेबसाईट किंवा सोशल मीडियामधून विवाह जुळवताना अनेकजण आढळतात. अनेकदा ऑनलाईन पद्धतीने एक फोटो दाखविला जातो. फोटो पाहून पसंती दिली, तर प्रत्यक्षात दुसरीच मुलगी दाखविली जाते. मुले पाहतानादेखील अनेकांना असा अनुभव येतो. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. आपली अशी फसवणूक होऊ नये म्हणून ऑनलाईन जोडीदार निवडताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

ही घ्या काळजी...

  • - लग्न करायचा विचार पक्का झाला असेल, तरच आपली माहिती लग्नविषयक साईटवर नोंदवा.
  • - एकदा तरी मुलाच्या किंवा मुलीच्या संपूर्ण तपशीलाची पडताळणी इंटरनेटवर करा.
  • - शक्य असल्यास मुलाची किंवा मुलीची फेसबुक अकाउंटवर माहिती मिळवा.
  • - स्मार्ट फोनवर मुलाचे किंवा मुलीचे फोन नंबर ट्रू कॉलर ॲपवर तपासा म्हणजे त्यांचे नाव बरोबर आहे का, इतके तरी किमान तपासून घेता येईल.

 

विवाह संकेतस्थळावर असलेल्या माहितीवर पूर्णत: विश्वास ठेवू नका. मुलगा किंवा मुलीच्या शिक्षणाबद्दल, नोकरीविषयी, ठिकाणाविषयी, प्रत्यक्ष त्याच्या किंवा तिच्या ऑफिसमध्ये जाऊन तेथील लोकांना भेटून चौकशी करून घ्या. आपल्या जवळच्या माणसांकडून माहिती घेऊन त्यांनी दिलेली माहिती बरोबर आहे का, याची खात्री करून घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहा.

- सूरज निंबाळकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, सोलापूर ग्रामीण

-----

आधी फोटो व बायोडेटा पाहूनच प्रत्यक्ष मुलगी पाहायला जाणे हे केव्हाही चांगले. पण, आधी फोटो जुना दाखवणे, प्रत्यक्षात दिसण्यात फरक असणे, असे अनुभव आले आहेत. त्यामुळे मी ओळखीच्या व्यक्तीने सांगितल्यावरच मुलगी पाहायला जातो.

- विवाहेच्छुक वर

ऑनलाईन पद्धतीने स्थळ पाहताना फसवणुकीची शक्यता टाळता येत नाही. मुलाचे वय, तो नक्की कुठे काम करतो, हे पडताळूनच पाहावे लागते. अनेकदा तर असलेल्या पगारापेक्षा अधिक पगार वाढवून सांगितला जातो. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वधू-वर सूचक मंडळाकडे जाण्याचा पर्याय अधिक चांगला आहे.

- विवाहेच्छुक वधू

सध्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो काढून त्यात फिल्टर वापरून बदल केले जातात. ऑनलाईन पद्धतीने स्थळ पाहताना फक्त मुलीकडीलच नव्हे, तर मुलाकडचेही दुसराच फोटो दाखवतात. आम्ही घेतलेल्या एका मेळाव्यात अनेक पालकांनी अशा तक्रारी केल्या. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत असताना प्रत्यक्षात त्या वेबसाईटचे कार्यालयही पाहायला हवे.

- आर्या इंगळे, संचालक, वधू-वर सूचक मंडळ

 

------

टॅग्स :Solapurसोलापूरfraudधोकेबाजीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम