श्वास घेण्यास त्रास होण्याचं निमित्त ठरलं; सोलापुरात तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

By विलास जळकोटकर | Updated: January 4, 2024 17:09 IST2024-01-04T17:09:09+5:302024-01-04T17:09:27+5:30

सुनील शंकर कांबळे (वय- २०, रा. रमाबाई आंबेडकर नगर, बुधवार पेठ, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.

Caused difficulty in breathing; Youth dies in hospital in Solapur | श्वास घेण्यास त्रास होण्याचं निमित्त ठरलं; सोलापुरात तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

श्वास घेण्यास त्रास होण्याचं निमित्त ठरलं; सोलापुरात तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

सोलापूर : एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्याच्या चर्चेनं लोकांमध्ये चिंता वाढत असताना सोलापुरात गुरुवारी एका तरुणाचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं निमित्त होऊन त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. 

सुनील शंकर कांबळे (वय- २०, रा. रमाबाई आंबेडकर नगर, बुधवार पेठ, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. यातील न्यू बुधवार पेठेत राहणारा तरुण सुनील याला बुधवारी रात्री श्वासोत्सवास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून येथील शासकीय रुग्णालयात निमित केसपेपर करुन उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधित तरुणाची तब्येत चिंताजनक वाटत असल्याने डॉ. पूजा बडवे यांनी गुरुवारी सकाळी त्याचा एमएलसी केस पेपर केला. 

सदर तरुण बेशुद्धावस्थेत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. सकाळी ८:४५ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.
 

Web Title: Caused difficulty in breathing; Youth dies in hospital in Solapur