तू जाड आहेस, काळी आहेस, माहेरुन १५ लाख घेऊन ये! पत्नीचा छळ

By रूपेश हेळवे | Updated: August 2, 2023 15:14 IST2023-08-02T15:14:02+5:302023-08-02T15:14:25+5:30

पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

case has been registered against four persons including the husband for harassment of wife | तू जाड आहेस, काळी आहेस, माहेरुन १५ लाख घेऊन ये! पत्नीचा छळ

तू जाड आहेस, काळी आहेस, माहेरुन १५ लाख घेऊन ये! पत्नीचा छळ

रुपेश हेळवे, सोलापूर : आम्ही लेण्याद्री येथे हॉटेलसाठी जागा घेतले आहे, तेथेच आणखीन एक हॉटेल बांधले आहे यासाठी माहेरून १५ लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विजयालक्ष्मी विक्रमसिंह हजारी ( वय २७, रा. गणेश नगर, बाळे) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विजयालक्ष्मी याचे विक्रमसिंह यांच्याशी विवाह झाला होता. तेव्हापासून सासरच्या मंडळींनी फिर्यादींना शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. आरोपी हे फिर्यादींना तु जाड आहे, तु काळी आहेस, तुझी लायकी नाही आमच्याकडे राहण्याची तु आम्हाला पसंत नव्हती. आम्ही लग्नात जास्त खर्च केला आहे. तुझ्या घरच्यांनी मानपान केला नाही. तसेच तू आम्हाला पंधरा लाख रुपये मोहरून घेऊन ये म्हणत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला, अशी फिर्याद विजयालक्ष्मी यांनी दिली आहे. याप्रकरणी पती विक्रमसिंह हजारी, सासू सीमा हजारी, नणंद स्मिता हजारी (सर्व. रा. राजयोग सोसायटी, कल्याण पेठ ता.जुन्नर, जि. पुणे) व गीता अभ्यंकर (रा. पिंपरी,पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार मुजावर करीत आहेत.

Web Title: case has been registered against four persons including the husband for harassment of wife