शौचविधीला जाताना अंगावरून कार गेली; कर्जाळ येथील अकरा वर्षीय मुलीचा जागीच अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:15 IST2018-12-31T14:14:24+5:302018-12-31T14:15:06+5:30
अक्कलकोट : शौचविधीला जाणाºया अकरा वर्षीय मुलीच्या अंगावरून कार गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अक्कलकोट- सोलापूर रस्त्यावरील ...

शौचविधीला जाताना अंगावरून कार गेली; कर्जाळ येथील अकरा वर्षीय मुलीचा जागीच अंत
अक्कलकोट : शौचविधीला जाणाºया अकरा वर्षीय मुलीच्या अंगावरून कार गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावरील कर्जाळ येथे रविवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. ऐश्वर्या संजय इंगळे असे मृत मुलीचे नाव आहे.
रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान कर्जाळ येथून अक्कलकोट रस्त्याने शौचविधीसाठी चालली होती. दरम्यान, अक्कलकोटहून सोलापूरकडे एक कार (क्रमांक एम. एच. १४/ एफ. सी. ३४४५) येत होती. त्या कारच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून मुलीच्या अंगावर घातले. थोड्या अंतरावर शिवाजी भीमशा इंगळे हेही होते. त्यांनी प्रसंगावधान ओळखून रोडच्या कडेला उडी मारली. त्याचदरम्यान कार ऐश्वर्याच्या अंगावरून गेली. ते उठून पहिले असता मुलीच्या दोन्ही पायास, डोक्यास, हातास, छातीस,गंभीर दुखापत झाल्याने खूप रक्तप्रवाह होत असल्याचे दिसले. ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती.
घटनेची माहिती मिळताच कमल बाळू कांबळे, सागर इंगळे, सचिन इंगळे, मनोज इंगळे यांनी तत्काळ गावातील वाहनातून घेऊन गेले. ऐश्वर्या ही कोंडीबा नगर येथील कोंडीबा इंगळे प्रशालेत पाचवीमध्ये शिकत होती. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगितले. तपास सदाशिव गवळी करीत आहेत.