गाडी नदीच्या पुलावर तर दोन युवक नदीपात्रात; पंढरपुरात विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 20:48 IST2021-07-21T20:47:59+5:302021-07-21T20:48:20+5:30

दोघांचा जागीच मृत्यू

The car is on the river bridge while the two youths are in the river basin; Strange accident in Pandharpur | गाडी नदीच्या पुलावर तर दोन युवक नदीपात्रात; पंढरपुरात विचित्र अपघात

गाडी नदीच्या पुलावर तर दोन युवक नदीपात्रात; पंढरपुरात विचित्र अपघात

पंढरपूर : भीमा नदीच्या अहिल्यापुलावरुन दोघेजण एकाच दुचाकीवरुन पंढरपूरकडे येत होती. यावेळी गाडी पुलावरील सुरक्षा कठड्याला धडकली. या अपघातात दुचाकी वाहन नदीवरील पुलावर राहिले, तर दोन तरुण भीमा नदीत पडले. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल राजेश चौगुले (वय २५, रा. ज्ञानेश्वर नगर, पंढरपूर) व विक्रम जगन्नाथ खरात (वय ३२, रा. गुरसाळे, पंढरपूर) हे तरुण त्यांच्या विनानंबरच्या दुचाकीवरुन भटुउंबरे (ता. पंढरपूर) येथील अहिल्यादेवी चौकातून पंढरपूरकडे भीमा नदीवरील अहिल्या पुलावरुन येत होते. यावेळी त्यांची दुचाकी पुलावरील लोखंडी सुरक्षा कठड्यांना धडकली. यानंतर दुचाकी वाहन पुलावर राहीले, तर ते तरुण भीमानदीच्या पात्रात पुलावरुन पडले.

दोन युवक बुडत असल्याचे पाहून समाजसेवक सुरज राठी, तुकाराम करकंबकर व अन्य त्यांना वाचवण्यासाठी गेले. त्यानंतर त्या दोघांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. व उपजिल्हा रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. परंतु त्या दोघांचा देखील मृर्त्यू झाला. याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

Web Title: The car is on the river bridge while the two youths are in the river basin; Strange accident in Pandharpur