किराणा दुकानात कार घुसली; आजी व नातूचा जागीच मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2023 23:00 IST2023-02-26T22:59:36+5:302023-02-26T23:00:29+5:30
सुदैवाने दुकान मालक बाहेर असल्यामुळे बालंबाल बचावला.

किराणा दुकानात कार घुसली; आजी व नातूचा जागीच मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना
अरुण लिगाडे, सांगोला\सोलापूर: भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात किराणा दुकानासमोर थांबलेल्या चौघा प्रवाशांना चिरडल्याने आजी व नातूचा जागीच मृत्यू झाला तर पती-पत्नीसह तिघेजण जखमी झाले. यावेळी वेगातील कार तशीच पुढे किराणा दुकानाची भिंत फोडून आत घुसली. सुदैवाने दुकान मालक बाहेर असल्यामुळे बालंबाल बचावला.
हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास चिकमहुद- दिघंची रोडवरील शेरेवाडी कटफळ (ता सांगोला) येथे घडला. द्रोपदी शिवाजी आटपाडकर ५० व सिद्धेश्वर नामदेव काळेल -७ ( रा. कटफळ आटपाडकर वस्ती) असे मृत आजी व नातूचे नाव आहे तर नामदेव सदाशिव काळेल ३५ व रुक्मिणी नामदेव काळेल ३० (दोघेही रा.कटफळ, आटपाडकर वस्ती ता. सांगोला ) तसेच पिकअप चालक विष्णू बळीराम मेंगाने- जाधव (रा. शिंगोर्णी ता. माळशिरस) अशी जखमीची नावे आहेत. दरम्यान स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचाराकरता दिघंची (ता.आटपाडी) येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब जवळ, विकास क्षीरसागर, पोलीस नाईक कुंभार पोलीस पाटील प्रभाकर कांबळे, पत्रकार दीपक धोकटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना बाहेर उपचाराकरिता पाठवण्यासाठी मदत केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"