अक्कलकोटजवळ कार अन् टेम्पोचा अपघात; नांदेडचे चार जण ठार
By Appasaheb.patil | Updated: January 1, 2025 12:34 IST2025-01-01T12:34:05+5:302025-01-01T12:34:27+5:30
सोलापूर-अक्कलकोट रोडवरील मैंदर्गी गावाजवळील शाब्दी फॉर्म हाऊससमोर आयशर टेम्पो व कारचा भीषण अपघात झाला.

अक्कलकोटजवळ कार अन् टेम्पोचा अपघात; नांदेडचे चार जण ठार
सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट रोडवरील मैंदर्गी गावाजवळील शाब्दी फॉर्म हाऊससमोर आयशर टेम्पो व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात नांदेडचे चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती अक्कलकोट पोलिसांनी लोकमतशी बोलताना दिली.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अक्कलकोटचे दर्शन घेऊन गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांचा गाडीचा अपघात झाला आहे. स्कॉर्पिओ आणि आयचर ट्रक समोरसमोर धडकली. समोरासमोर झालेल्या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाले असून ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. अपघातात मयत व जखमींची नावे अद्याप समोर आली नाहीत.