मोडनिंबजवळ कार व कंटेनरचा अपघात, दापोडी येथील पती-पत्नी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:20 IST2017-11-23T15:17:59+5:302017-11-23T15:20:49+5:30
सोलापूरहुन पुण्याकडे जाणाºया फॉरच्युअनर कारने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंबनजीक घडला़

मोडनिंबजवळ कार व कंटेनरचा अपघात, दापोडी येथील पती-पत्नी जागीच ठार
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : सोलापूरहुन पुण्याकडे जाणाºया फॉरच्युअनर कारने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंबनजीक घडला़
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूरहुन पुण्याकडे भरधाव वेगात जाणारी फॉरच्युअनर कार (एमएच १४ इआर ०९२८) ही कार अतिवेगात पुण्याकडे जात होती़ यावेळी मोडनिंबनजीक पुण्याकडे जाणाºया कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेत कारमधील दोघांना जबर मार लागला़ यात दोघांचा जागीच मृत्यू झाला़ कारमधील दोघे हे पती-पत्नी असल्याची माहिती समोर आली असून त्यांची नावे संजय व रीना अशी असून दोघेही दापोडी येथील असल्याची माहिती पुढे आली आहेत़