अक्कलकोटजवळ बस पलटी; २७ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2022 13:57 IST2022-07-24T13:57:06+5:302022-07-24T13:57:12+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

अक्कलकोटजवळ बस पलटी; २७ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
अक्कलकोट : अक्कलकोट पासून ३ किलोमीटर अंतरावर बस पलटी होऊन २७ जण जखमी झाले असून तिघेजण गंभीर आहेत. २१ रुग्णांवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, ४ जणांवर अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात तर दोघेजण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना सकाळी ९ वाजता घडली आहे. सदर बस कर्नाटक राज्यातील तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे जात होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक राठोड यांना कॉल करून घटनेची माहिती घेतली आहे. घटना घडल्यापासून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी तळ ठोकुन जखमींची व्यवस्था केली आहे. शिवाय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासकीय रूग्णालयात जखमी प्रवाशांची भेट घेऊन त्याच्यावर होत असलेल्या उपचाराबाबत माहिती घेतली.