शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

सोलापुरात इमारतीला लागली भीषण आग; गाड्या, दुकानांचं साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 21:40 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : सोलापूर शहरात रेल्वे लाईन्स भागात असलेल्या सात मजली 7 थ हेव्हन या इमारतीच्या बेसमेंट पार्किंग मध्ये आज सायंकाळी 5:30 च्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीच स्वरूप रुद्र होतं. पार्किंग मधील अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहन तसेच येथील उत्सव मंडळाचे साहित्य, मेडिकल दुकानाचे साहित्य इतर फर्निचर जळून खाक झाले आहे.

आग आणि धुराचे लोट प्रचंड होते. इमारतीतील विद्युत पुरवठा खंडित झाला. वरच्या मजल्यावर राहणारे लोक गच्चीवर गेले. यात वृद्ध आणि मुलांचाही समावेश होता. धूर जिन्यामधे तसेच इमारतीतील प्रत्येक घरांमध्ये साठाला. या इमारतीत एकूण 48 फ्लॅट आहेत अशी माहिती मिळाली.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या  पाणी फवारणी करत होत्या, तरीही आग दोन तास आटोक्यात आली नाही. अग्निशमनअधीक्षक केदार आवटे स्वतः आग नियंत्रणामध्ये सहभागी झाले होते. अखेर  जेसीबी न दर्शनी भाग फोडून पाणी फवारणी तसेच फोम फवारणी करावी लागली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर तसेच पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे आणि पोलिस फोर्स काही वेळातच पोहोचले. येथील नगरसेवक चेतन नरोटे , विनोद भोसले, शेजवाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना इमारतीतून बाहेर काढण्यात मदत केली. स्वतः उपायुक्त बांगर आणि कडूकर यांनी गच्चीवर जाऊन तेथे थांबलेल्या वृद्ध आणि महिलांना सुरक्षित खाली आणण्यात मदत केली.

 दरम्यान, घटनास्थळी पालिका आयुक्त पी. शिवशंकर महापौर श्रीकांचना यन्नंंम यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री आठ तीस सुमारास आग आटोक्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका