शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

BRS: ‘महाराष्ट्रातील सर्व विधानसभा बीआरएस लढविणार’, केली जोरदार मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 12:13 IST

BRS News: महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात बीआरएस पक्ष उमेदवार देणार आहे, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी सरकोली येथे सांगितले.

पंढरपूर - महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात बीआरएस पक्ष उमेदवार देणार आहे, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी सरकोली येथे सांगितले.

केसीआर हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते. मंगळवारी सरकोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना राव यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टीका करत महाराष्ट्रात परिवर्तनाची हाक दिली. शेतकरी मेळाव्यात ‘अबकी बार, किसान सरकार’ अशी घोषणा देत, बंगारू तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे सांगितले.

यावेळी बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, बाळासाहेब देशमुख, माणिकराव कदम, तसेच अर्थमंत्री हरीश राव व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्रिपदाची ऑफर : राजू शेट्टीकोल्हापूर : भारत राष्ट्र समितीकडून (बीआरएस) मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, गेल्या वेळी गुजरात मॉडेलच्या आमिषाने फसगत झाली आहे. आता केसी राव यांच्या आश्वासनाला फसणार नाही. एकला चलोची भूमिका आहे. स्वाभिमानी हातकणंगलेसह राज्यातील चार लोकसभेच्या जागा लढविणार आहे. प्रसंगी बारामतीची जागाही लढणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावMaharashtraमहाराष्ट्र