वेळेवर उपचार न मिळाल्याने भावाचा जीव गेला; तरूणाची सोशल मिडियावर तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:56 AM2020-05-29T11:56:40+5:302020-05-29T12:22:48+5:30

सोलापुरातील घटना;  मार्कंडेय सहकारी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

The brother died due to untimely treatment; Youth's complaint on social media | वेळेवर उपचार न मिळाल्याने भावाचा जीव गेला; तरूणाची सोशल मिडियावर तक्रार

वेळेवर उपचार न मिळाल्याने भावाचा जीव गेला; तरूणाची सोशल मिडियावर तक्रार

Next
ठळक मुद्देविजापूर नाका येथील सूरज बुरुंगवार या तरुणाने गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केलासिव्हिल हॉस्पिटल, मार्कंडेय रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या वागणुकीबद्दलचे कथन आपल्या भावाचा जीव गेल्याची तक्रार विजापूर नाका येथील एका तरुणाने सोशल मीडियावर

सोलापूर : रुग्णालयाने वेळेवर उपचार न केल्याने आपल्या भावाचा जीव गेल्याची तक्रार विजापूर नाका येथील एका तरुणाने सोशल मीडियावर केली. याप्रकरणी मार्कंडेय सहकारी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आरोग्य अधिकाºयांना दिल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी बुधवारी दिली.

विजापूर नाका येथील सूरज बुरुंगवार या तरुणाने गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. त्यात त्याने सिव्हिल हॉस्पिटल, मार्कंडेय रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या वागणुकीबद्दलचे कथन केले. ‘माझ्या भावाला २३ मे रोजी न्यूमोनियाचा त्रास झाला. प्रथम मी त्याला मार्कंडेय रुग्णालयात घेऊन गेलो. मार्कंडेय रुग्णालयाने खाट उपलब्ध नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तिथे अनेक खाट रिकामे होते. त्यामुळे आम्ही त्याला सिव्हिलमध्ये घेऊन गेलो. तिथे एक्स-रे काढले. भावाला कोरोनाची लागण नसल्याचे पत्र सिव्हिलकडून घेतले. पुन्हा मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये गेलो. तरीही या हॉस्पिटलने दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे मी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या टोल फ्री नंबरवर तक्रार करण्यासाठी फोन केला. नियंत्रण कक्षातील लोकांनी मला एका डॉक्टरांचा फोन नंबर दिला. तो फोन बंद होता. पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर दुसºया डॉक्टरांचा नंबर देण्यात आला. मात्र, या डॉक्टरांनी आपण रजेवर असल्याचे सांगितले. पुन्हा नियंत्रण कक्षाने महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांचा नंबर दिला. आरोग्य अधिकाºयांचा फोन बंद होता. सहायक आरोग्य अधिकाºयांना फोन केल्यानंतर त्यांनीही टाळाटाळ केली. त्यामुळे आम्ही भावाला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो.

सिव्हिल हॉस्पिटलची कचराकुंडी झाली आहे. येथील अवस्था पाहून भावाची प्रकृती आणखी बिघडली. तिथे त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आम्ही पुन्हा रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टरांच्या हातापाया पडलो. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला दाखल केले. मात्र, त्याच्यावर व्यवस्थित उपचार झाले नाहीत, असा आरोप सूरजने व्हिडिओमध्ये केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेअर केला. मनपा उपायुक्त जावळे यांनी याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

भोंगळ कारभार : मार्कं डेय रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
रुग्णालयाविरोधात तक्रार व्यक्त होणारा एक व्हिडिओ मी पाहिला. व्हिडिओ पाहिल्यानंतर मी आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांशी बोललो. सदर प्रकरणाची माहिती घेतली. व्हिडिओमध्ये बोलणारा युवक हा पूर्ण सत्य सांगत नाहीये. पेशंटच्या नातेवाईकांशी बोलूनच आम्ही योग्य उपचार केला. आवश्यक ट्रीटमेंट दिली. तरीसुद्धा असे आरोप होत असतील तर ते चुकीचे आहे. यातून डॉक्टरांचे मनोधैर्य खचेल, असे आम्हाला वाटते.
- डॉ. माणिक गुर्रम, अध्यक्ष, श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय, सोलापूर 

Web Title: The brother died due to untimely treatment; Youth's complaint on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.