Breaking; सोलापुरातील भाजपचे कार्यकर्ते वीरभद्रेश्वर बसवंती यांचे कोरोनाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 13:44 IST2021-04-14T13:44:12+5:302021-04-14T13:44:18+5:30

वीरभद्रेश बसवंती हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष होते

Breaking; Virbhadreshwar Baswanti, a BJP activist from Solapur, died in a corona | Breaking; सोलापुरातील भाजपचे कार्यकर्ते वीरभद्रेश्वर बसवंती यांचे कोरोनाने निधन

Breaking; सोलापुरातील भाजपचे कार्यकर्ते वीरभद्रेश्वर बसवंती यांचे कोरोनाने निधन

सोलापूर -  भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वीरभद्रेश बसवंती यांचे आज वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. 

वीरभद्रेश बसवंती हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष होते. कसबा गणपतीचे ही सल्लागार होते,वीरशैव लिंगायय समाजाचे कार्यकर्ते याशिवाय अटलजी प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष होते अटलजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याने अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम शहरात राबवले होते. नुकत्याच झालेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीतही ते उभे राहिले होते. बसवंती मंगल कार्यालयाचे मालक अशी त्यांची ओळख होती. जनसंघाचे जुने कार्यकर्ते बाबुराव बसवंती यांचे ते चिरंजीव होते. अशा कार्यकर्त्याच्या जाण्याने समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

 

Web Title: Breaking; Virbhadreshwar Baswanti, a BJP activist from Solapur, died in a corona