Breaking; सोलापूर महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 10:57 IST2021-08-10T10:56:25+5:302021-08-10T10:57:39+5:30

अहमदनगरचे संतोष सांगळे सोलापूरचे नवे अधीक्षक अभियंता

Breaking; Transfer of Dyandev Padalkar, Superintendent Engineer, Solapur MSEDCL | Breaking; सोलापूर महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची बदली

Breaking; सोलापूर महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची बदली

सोलापूर - महावितरणचेसोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची नाशिक मंडलात अधीक्षक अभियंता या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी अहमदनगरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ज्ञानदेव पडळकर यांनी मागील तीन ते चार वर्षांच्या काळात जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम केले. वीज जोडणी, थकबाकीची वसुली, अखंडित वीजपुरवठा करण्याला प्राधान्य, सर्वसामान्य लोकांच्या घरात लवकर वीज पोहोचावी यासाठी धडपड केली. पडळकर यांनी यापूर्वी पुण्यासारख्या मोठ्या शहरातही काम केले आहे. त्यांची नाशिक येथील मंडलात बदली झाली असून लवकरच ते पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.

संतोष सांगळे हे लवकरच सोलापूरच्या अधीक्षक अभियंता पदावा पदभार स्वीकारणार आहेत. सांगळे यांनीही विविध पदावर काम केले असून महावितरणच्या विविध योजना, उपक्रमांची त्यांनी चांगली अंमलबजावणी करून राज्य पातळीवर नावलौकिक केले आहे. 

Web Title: Breaking; Transfer of Dyandev Padalkar, Superintendent Engineer, Solapur MSEDCL