Breaking; गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक; दोघांवर सोलापुरात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:36 IST2021-07-01T17:35:18+5:302021-07-01T17:36:34+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

Breaking; गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक; दोघांवर सोलापुरात गुन्हा दाखल
सोलापूर - विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक केल्याप्रकरणी सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरात घोंगडी बैठकीला आल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला होता. काल रात्रीपासून सोशल मिडियावर दगडफेक करणार्या तरूणाचा व्हिडिओ व्हायरल होत होता. जोडभावी पेठ पोलीस त्या तरूणाचा शोध घेत होते. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यापर्यंत पोलिसांनी शोध घेतला मात्र तो तरूण अद्याप पोलिसांच्या जाळ्यात सापडला नाही.
दरम्यान, अमित सुरवसे आणि शिरसागर नामक दोन तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित सुरवसे यांनी यापुर्वी मुंबई येथै आझाद मैदानावर आरक्षणासाठी आंदोलन केले होते. दोघेही तरूण सामाजिक कार्यात सक्रीय असल्याची सुत्रांची माहिती आहे.