Breaking; अक्कलकोटजवळ एसटी बस पलटी; सहा प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 01:40 PM2022-05-20T13:40:27+5:302022-05-20T13:41:32+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; ST bus overturns near Akkalkot; Six passengers were injured | Breaking; अक्कलकोटजवळ एसटी बस पलटी; सहा प्रवासी जखमी

Breaking; अक्कलकोटजवळ एसटी बस पलटी; सहा प्रवासी जखमी

Next

उडगी :  बबलाद परमानंद तांड्यावरून अक्कलकोटकडे निघालेली एसटी बस कलप्पावाडी गावापासून अवघ्या अर्धा किलो मिलीमीटर अंतरावर रस्त्यावरच्या खड्ड्यात बस आदळल्याने अचानकपणे बसची स्टेरिंग रॉड तुटल्याने मल्लिकार्जुन बंडगर यांच्या शेतात बस पलटी झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या बसमध्ये साधारणपणे ५० ते ६० प्रवाशी प्रवास करत होते.

 यावेळी बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. चालक जाधव यांच्या प्रसंगासवधानमुळे सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाली आहेत. .स्थानिक लोकांच्या मदतीने बाकीच्या सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहेत.  या दरम्यान अपघात झाल्याचे कळताच कलप्पावाडी व परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. महेश जानकर, (माजी सभापती) हे लग्न समारंभासाठी जात असताना समोरचा दृश्य पाहून त्याठिकाणी थांबून जखमी प्रवाशांची आस्थेने विचारपूस करून तात्काळ  रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले.  
      यावेळी मारुती सोनकर, जयकुमार जानकर (सरपंच), संजय पांढरे, शंकर जानकर मनोहर देवकते, सलीम मासुलदार यांच्यासह गावकारी मंडळ मदतीसाठी धावून आले.

Web Title: Breaking; ST bus overturns near Akkalkot; Six passengers were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app