Breaking; राष्ट्रवादीचे सुहास कदम अडचणीत; पक्षाने केली मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 14:47 IST2022-05-16T14:47:48+5:302022-05-16T14:47:54+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; राष्ट्रवादीचे सुहास कदम अडचणीत; पक्षाने केली मोठी कारवाई
सोलापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुहास कदम याचे पद स्थगित ठेवण्यात येत असल्याचे पत्र विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी काढले असून खुलासा येईपर्यंत पद स्थगित ठेवण्यात येईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपले काम होत नसून बरोबरच त्याच्या उलट कृती आपल्याकडून होत आहे असे निर्दशनास आले आहे. या कारणावरून आपले पद स्थगित करण्यात येत आहे, आपल्याकडून पुढील खुलासा येईपर्यंत आपले पद स्थगित ठेवण्यात येईल असेही सुनिल गव्हाणे यांनी सुहास कदम यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.