Breaking; पंढरीत महिलेचा धारदार शस्त्राने खून; कुंभार गल्लीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 08:36 IST2020-07-10T08:34:39+5:302020-07-10T08:36:08+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Murder of a white woman with a sharp weapon; The Potter Street incident | Breaking; पंढरीत महिलेचा धारदार शस्त्राने खून; कुंभार गल्लीतील घटना

Breaking; पंढरीत महिलेचा धारदार शस्त्राने खून; कुंभार गल्लीतील घटना

पंढरपूर : पंढरपूर एका २१ वर्षाच्या महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली आहे. निकिता आकाश पवार असे त्या महिलेचे नाव आहे.

शहरातील कुंभार गल्ली येथे महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तत्काळ उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस कर्मचारी सतीश चंदनशिवे, सुजित उबाळे, सुजित जाधव, संदीप पाटील, सिद्धनाथ मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

यावेळी निकिता पवार या विवाहित महिलेच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून कशामुळे झाला याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Breaking; Murder of a white woman with a sharp weapon; The Potter Street incident