Breaking; माढा नगरपालिका निवडणूक निकाल; पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 12:15 IST2022-01-19T11:17:44+5:302022-01-19T12:15:41+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Madha municipal election results; Husband and wife won from the same ward | Breaking; माढा नगरपालिका निवडणूक निकाल; पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी

Breaking; माढा नगरपालिका निवडणूक निकाल; पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी

अमर गायकवाड

माढा : माढा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सत्ताधारीसाठी गटाने 12 जागा मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागेचे नुकसान झाले आहे, तर शिवसेनेने अपक्षासह 3 जागा मिळवत नगरपंचायत मध्ये प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक एकमधून आजिनाथ भागवत राऊत व सुनिता अजिनाथ राऊत हे पती - पत्नी निवडणुकीत विजयी झाले आहेत.

माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे व माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजारनाना भांगे यांचे सुपुत्र आदित्य भांगे यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून विकास कामाच्या जोरावर काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे. माजी नगराध्यक्ष मीनल साठे माजी सभापती कल्पना जगदाळे माजी विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे माजी नगरसेविका संजीवनी भांगे अनिता चवरे या निवडणुकीत विजयी झाल्या असून माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांच्या पत्नी अर्चना कानडे या विजयी झाल्याने शहरातील प्रमुख नेते मंडळीचा या नगरपंचायतीमध्ये सहभाग पाहायला मिळणार आहेत. माजी नगरसेविका राणूबाई गाडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Web Title: Breaking; Madha municipal election results; Husband and wife won from the same ward