शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

Breaking; जागेच्या कारणावरून रेल्वेत प्रवाशावर चाकूने हल्ला; सोलापुरातील घटना

By appasaheb.patil | Published: September 28, 2022 9:01 AM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

 सोलापूर : रेल्वेच्या जनरल डब्यात जागेच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांनी एका प्रवाशावर चाकूने हल्ला केला. ही घटना मंगळवारी सोलापूरजवळ घडली. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २७ सप्टेंबर २०२२ रोजी आदम बुड्ढेसाहेब गुडेश्वर (वय ३२, राहणार विजयपूर कर्नाटक) हा गदग - मुंबई या रेल्वेने विजयपुर येथून त्याच्या पत्नीस आणण्यासाठी मुंबई येथे जाण्याकरिता जनरल डब्यात प्रवास करीत असताना तेथे बसल्यावर जागेच्या कारणासाठी दोन अनोळखी प्रवाशांनी त्याच्याशी वाद घालून त्याला लाथाबुक्क्याने, हाताने मारून त्याच्या डाव्या बरगडीजवळ चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर योग्य ते उपचार डॉक्टरांकडून चालू आहेत.

याबाबत सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड हे करीत आहेत.

दरम्यान, गुन्ह्याचे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, डीवायएसपी मौला सय्यद, एल सीपीआय इरफान शेख या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या गुन्ह्यातील अनोळखी आरोपी शोधण्यासाठी कर्नाटक व विजापूर परिसरामध्ये दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस