Breaking; आलेगाव शिवारात आत्महत्येची घटना; आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: May 11, 2022 08:48 IST2022-05-11T08:47:33+5:302022-05-11T08:48:08+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; आलेगाव शिवारात आत्महत्येची घटना; आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
सोलापूर : आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली. या या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे.
दरम्यान, सोनाली सिद्राम चोपडे, मोठा मुलगा संतोष सिद्राम चोपडे (वय वर्षे 8), लहान मुलगा संदीप चोपडे (वय वर्षे 5, सर्व राहणार तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर) यांनी आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 30/ 2 चे मालक दयानंद वसंत शिंदे यांचे शेतातील विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत झाले आहे.