Breaking; खून प्रकरणातील आरोपीने केले पलायन; पंढरपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:39 IST2020-07-12T12:36:29+5:302020-07-12T12:39:01+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; खून प्रकरणातील आरोपीने केले पलायन; पंढरपुरातील घटना
पंढरपूर : एका खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने संसर्गजन्य रुग्णालयातून शौचास जाण्याच्या बहाण्याने पलायन केल्याची घटना रविवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे. पलायन केलेल्या आरोपीचे नाव शिवाजी नाथाजी भोसले (वय ५५) असे आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८०/२०१६ नुसार दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी शिवाजी नाथाजी भोसले (वय ५५, रा. तिसंगी ता.पंढरपुर) याला जेलमधून पंढरपूर नगरपरिषदेच्या संसर्गजन्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, रविवारी पहाटे शौचालय जाण्याच्या बहाण्याने शौचालयाच्या खिडकीतून पलायन केले आहे. पलायन करतेवेळी त्याच्या अंगामध्ये काळ्या रंगाची पॅन्ट व चेकसचा काळसर रंगाचा शर्ट होता. त्याची दाडी व पांढरे केस वाढलेले केस असा वेश आहे. त्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.