Breaking; ७० फूट रोड, कुमठा नाका, इंदिरानगर , गेंटयाल चौक केला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 10:53 IST2020-04-19T10:21:41+5:302020-04-19T10:53:44+5:30

सोलापूर शहर पोलिसांची कारवाई; नागरिकांना या परिसरात येण्यास मनाई...!

Breaking; 1 Foot Road, Kumtha Naka, Indiranagar, Gential Chowk Banana Seal | Breaking; ७० फूट रोड, कुमठा नाका, इंदिरानगर , गेंटयाल चौक केला सील

Breaking; ७० फूट रोड, कुमठा नाका, इंदिरानगर , गेंटयाल चौक केला सील

ठळक मुद्देसोलापूर शहर पोलीस अलर्टसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होतेय वाढबाधित रुग्णांच्या परिसरातील लोकांची तपासणी सुरू


सोलापूर : शहरातील गजबजलेल्या ७० फूट रोड, इंदिरानगर,  गेंटायल टॉकीज, कुमठा नाका हा परिसर पोलिसांनी सील केला आहे. इंदिरानगर या भागातील एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समजतात ही कारवाई करण्यात आली आहे. 


इंदिरानगर या भागातील एक महिला शासकीय रुग्णालयात ॲडमिट आहे. तिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समजताच रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सदर बाजार पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केला आहे. दाटीवाटीची आणि मोठी लोकवस्ती असलेल्या या भागांमध्ये बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. परिसरातील व्यक्तीला बाहेर सोडले जात नाही.

कोरोना विषाणू पॉझिटिव्ह असलेल्या महिलेच्या घरातील लोकांना तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यासह सर्व गल्लीबोळातील जाणे येण्याच्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Web Title: Breaking; 1 Foot Road, Kumtha Naka, Indiranagar, Gential Chowk Banana Seal