जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड; पंढरपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 17:59 IST2020-09-07T17:59:27+5:302020-09-07T17:59:33+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड; पंढरपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय
पंढरपूर : भीमा नदीपात्रामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे, परंतु जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये बिघाड झाल्याने पंढरपूर शहरातील काही भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
पंढरपुरातील जलशुद्धीकरण केंद्रातील वॉल खराब झाला आहे. या वॉलची दुरुस्ती करण्यासाठी किमान चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा करता येणार आहे.
दरम्यान, संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. यावर पर्याय म्हणून पाणी पुरवठा करण्यासाठी शहराचे दोन भाग करण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे रुळावरील भाग व रेल्वे रेल्वे रुळाखालील भागात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा अधिकारी आत्माराम जाधव यांनी सांगितली.