मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलाच्या वडिलास झाडाला बांधून केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:38 IST2020-08-11T13:36:24+5:302020-08-11T13:38:54+5:30
मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील घटना; पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलाच्या वडिलास झाडाला बांधून केली मारहाण
मंगळवेढा : मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून चक्क मुलाच्या वडिलास भरचौकात झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील भाळवणी येथे घडली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे़ या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील मुलीने तिच्या घराशेजार राहणाºया मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे़ या घटनेची खंत त्या मुलीच्या संबंधित नातेवाईक भावकीला होती, त्याचा राग मनात धरून मुलाच्या वडिलाने फोन का केला यावरून मागील रागाचा वचपा काढत त्याला घरापासून तीन किलोमीटर अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकातील लिंबाच्या झाडाला बांधून आणखीन मारहाण करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला़ त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे़ पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चौघाला जणांना ताब्यात घेतले. इतर सहभागी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.