शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

थकीत वेतन न मिळाल्यास लोकसभेच्या कामावर बहिष्कार; सोलापूर परिवहन कर्मचाºयांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:12 PM

सोलापूर : गेल्या दोन महिन्यांचे थकीत वेतन चार-पाच दिवसांत न दिल्यास लोकसभा निवडणुकीतील मतदान यंत्राची वाहतूक करणार नाही. बस ...

ठळक मुद्देमहिला व बालकल्याणकडील बिलापोटी ६९ लाख रुपयांचा अ‍ॅडव्हान्स मिळावा - परिवहन समितीउद्या कामगारांनी संप पुकारला तर आम्ही कामगारांसोबतच राहू. महापालिका आयुक्तांनी परिवहनचे बिल दिलेच पाहिजे - परिवहन समिती

सोलापूर : गेल्या दोन महिन्यांचे थकीत वेतन चार-पाच दिवसांत न दिल्यास लोकसभा निवडणुकीतील मतदान यंत्राची वाहतूक करणार नाही. बस वाहतूक ठप्प करु, असा इशारा महापालिका परिवहन उपक्रमातील कामगार कृती समितीने दिला आहे. 

मनपा परिवहन उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पगार न मिळाल्याने परिवहन कर्मचाºयांनी २१ जानेवारीपासून संप पुकारला होता. विशेष म्हणजे या संपाला परिवहन समितीचे तत्कालीन सभापती तुकाराम मस्के यांच्यासह समितीने पाठिंबा दिला होता. मनपा प्रशासनाने अ‍ॅडव्हान्स देण्यास नकार दिला. त्यामुळे हा संप चिघळण्याच्या मार्गावर होता. अखेर महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

संप मागे घेताना कर्मचाºयांचा नोव्हेंबरचा पगार रोखीने करण्यात आला तर डिसेंबरचा पगार आठ दिवसांनी थेट खात्यावर जमा करण्यात आला. पुढील पगार करण्यात अडचण येणार नाही, असे परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी सांगितले होते. पण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही परिवहन कर्मचाºयांचा पगार झालेला नाही. यासंदर्भात त्यांनी परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र मल्लाव वेळकाढूपणा करीत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. 

कुठे आहेत मल्लाव ? कामगारांचा सवाल - कर्मचारी कृती समितीचे प्रमुख देविदास गायकवाड म्हणाले, आमच्या अडचणीबाबत आम्ही परिवहन व्यवस्थापकांकडे जातो, पण ते आम्हाला भेटण्यास तयार नसतात. आता आमच्या पगाराची अडचण झाली आहे. पण ते कुठे आहेत? असा सवाल कामगार करीत आहेत़ चार-पाच दिवसांत पगार न झाल्यास आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रे वाहतुकीचे काम करणार नाही. राजकीय नेते असंवेदनशील असल्यामुळेच आमच्यावर ही वेळ आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. 

महिला व बालकल्याणकडील बिलापोटी ६९ लाख रुपयांचा अ‍ॅडव्हान्स मिळावा. मनपा अंदाजपत्रकात परिवहनसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे पैसेही द्यावेत़ यासाठी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची नुकतीच भेट घेतली. आयुक्तांनी दोन दिवसांत निर्णय देऊ, असे सांगितले होते. पण अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. उद्या कामगारांनी संप पुकारला तर आम्ही कामगारांसोबतच राहू. महापालिका आयुक्तांनी परिवहनचे बिल दिलेच पाहिजे. - गणेश जाधव सभापती, परिवहन समिती. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBus DriverबसचालकStrikeसंप