शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

उजनी धरणाच्या निसर्गरम्य परिसरात बोटींवरील हॉटेलिंगला मिळणार चालना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:49 IST

जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमदारांची बैठक : कोयना अन् तारकर्लीच्या धर्तीवर होणार पर्यटन विकास

भीमानगर : उजनी धरण परिसरातील सौंदर्याचा फायदा करून घेण्यासाठी पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. याठिकाणी बोटीवरील हॉटेलिंग, पक्षी निरीक्षण केंद्र आणि उद्याननिर्मिती करण्याबाबतही चर्चा झाली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उजनी धरणाला भेट देऊन बोटीतून पाहणी केली, तसेच उजनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या  बैठकीत अनेक विषयांवर चर्चाही झाली. कोयना अन् तारकर्लीच्या धर्तीवर या ठिकाणी पर्यटन विकास होण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेतला गेला. या बैठकीत आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर वन विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा वन अधिकारी धैर्यशील पाटील, माढा प्रांत अधिकारी ज्योती कदम, सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, जलपर्यटन तज्ज्ञ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे डॉ. सारंग कुलकर्णी, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, पाणस्थळ विकासचे सल्लागार तथा भारतीय वनसेवा अधिकारी जयंत कुलकर्णी, पक्षी निरीक्षक डॉ. व्यंकटेश मेतन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उबाळे, डॉ. प्राची मेहता, सचिन लोकरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सारंग कुलकर्णी व जयंत कुलकर्णी यांनी उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाबाबत वेगवेगळ्या स्लाइड शोचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, रोजगारनिर्मिती व्हावी, गर्दी वाढावी, खाजगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी उजनी धरणावरील पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर डेव्हलप करणे गरजेचे आहे.  सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संजयमामा शिंदे आणि टीमसोबत बोटीमध्ये बसून पाहणी केली.

स्थानिकांना रोजगार मिळेल... उजनी जलाशयावर वर्षभर वेगवेगळ्या खंडातून पक्षी येत असतात. यामुळेदेखील पर्यटन व्यवसाय वाढेल, तसेच राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरण    असल्याने हॉटेलिंग व्यवसायही निसर्गरम्य वातावरणात नावारूपाला येईल. रोजगारात वाढ होईल व संबंधित विभागाला पर्यटनाच्या माध्यमातून महसूल गोळा होईल, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

जागेबाबत लवकरच आराखडालवकरच उजनी धरण पर्यटन विकास समिती नेमून जागेची निवड केली जाईल. बाग अन् बोटिंगसाठी निश्चित स्थळाबाबतचा आराखडा फायनल केला जाईल, असे धरण व्यवस्थापन विभागाने सांगितले.

तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरील स्कुबा केंद्रांचीही इथे निर्मिती करता येऊ शकते. जलाशयात बुडालेली इतिहासजमा गावं पाहण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. पाण्यातील मासे दर्शनही  पर्यटकांना नक्कीच आवडेल.- संजयमामा शिंदे, आमदार

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणenvironmentपर्यावरणtourismपर्यटन